वायु प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण
धूम्रपान न करणारे ही पडतायेत बळी फुफ्पुस दिनानिमित्त जागरूकता
भारतासह जगभरातल्या गेल्या काही वर्षात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. या वायू प्रदूषणामुळे आता लोकांना जीवघेणे आजार होत आहेत. फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम यामुळे दिसण्यात आलेला आहे. त्यामुळे फुफुसांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. तीस ते चाळीस वयोगटातील स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरलेला आहे. 10 सिगारेट ओढणाऱ्यांपैकी पाच आणि धूम्रपान न करणाऱ्या पाच जणांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले असल्याची माहिती सध्या समोर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असून यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. पर्यावरणीय प्रदूषणाव्यतिरिक्त घरातील हवेची गुणवत्ता चयापचय समस्या आणि कामाच्या ठिकाणी होणारे प्रदूषण यामुळे देखील धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेलं दिसून आले आहे. कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांच्या अहवालानुसार दशकापूर्वीच्या परिस्थितीच्या तुलने 2025 पर्यंत देशातील फुफ्फुसंच्या कर्करोगाचे प्रकरणे सात पटीने वाढण्याची शक्यता आहे. तीस ते चाळीस वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये सतत खोकल्याची लक्षणे दिसून येत आहे. तसेच धुम्रपानाचा इतिहास नसतानाही अशा लोकांमध्ये फुफुसाचा कर्करोग आढळून आलेला आहे. फुफुसांचा कर्करोग टाळण्यासाठी वेळेवर निदान आणि उपचार खूप महत्त्वाचे आहे. जागतिक फुफ्फुस दिनानिमित्त याकडे गंभीरतेने लक्ष देऊन लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आलेली आहे.