पंधरा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; सावेडी कचरा डेपोच्या जागेतच होणार स्मशानभूमी
निधीसाठी प्रस्ताव देण्याच्या सभापती व विरोधी पक्ष नेत्यांच्या सूचना
पंधरा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; सावेडी कचरा डेपोच्या जागेतच होणार स्मशानभूमी
निधीसाठी प्रस्ताव देण्याच्या सभापती व विरोधी पक्ष नेत्यांच्या सूचना
गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला सवेडी स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गे लागला आहे. सवडी कचरा डेपोच्या जागेत सर्व सामान्यांसाठी स्मशानभूमी उभारण्यासाठी निधीचा प्रस्ताव पुढच्या स्थायी समितीच्या सभेत सादर करा, असे निर्देश सभापती गणेश कवडे व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी बांधकाम विभागाला दिले. दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी चौथा उभारण्यासाठी व सुशोभीकरण करण्यासाठी 55.76 लाखांच्या कामाला स्थायी समितीने सोमवारी झालेल्या सभेत मंजुरी दिली. चळवळी कचरा डेपोच्या जागेत स्मशानभूमी उद्यान उभारणीसाठी मल्टीपर्पज आरक्षण प्रस्तावित करण्याचा निर्णय यापूर्वीच महासभेत घेण्यात आला होता, त्यानंतर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी 15 गुंठे जागेत तृतीयपंथीयांना दफनभूमीसाठी जागा दिली आहे. आता याच ठिकाणी उर्वरित जागेत सर्वसामान्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मशानभूमी उभारण्यासाठी निधी मंजुरीचा प्रशासकीय प्रस्ताव पुढच्या स्थायी समितीच्या सभेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सावळी परिसरात लोकसंख्या दोन लाखांवर पोहोचली आहे. स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी 8 km लांब अमरधाम मध्ये जावे लागते. स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी यावेळी सांगितले.