गंभीर गुन्ह्यातील पुरावे गोळा करणार : गुन्ह्यांची उकल करण्यास उपयुक्त आय बाईक पुण्यात नवा प्रयोग
''आय बाईक''चा पुण्यात नवा प्रयोग
पुणे : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा छडा लावून आरोपीला शिक्षा करण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे हे कायम महत्त्वाचे ठरतात. हे सबळ पुरावे एकत्रित करण्यासाठी पुणे शहर पोलीस दलात आता इन्वेस्टीगेटिव्ह बाईक म्हणजेच ‘आय बाईक’ या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास, अवघड केस सोडविण्यासाठी मदत होणार आहे नवीन कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शहर पोलीस आयुक्तालयाकडून पावले उचलले जात आहेत सात वर्ष आणि त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात न्याय वैद्यक पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देणे बंधनकारक आहे त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आय-बायिक पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत या अनुषंगाने प्रारंभिक परिमंडळ निहाय बाईक उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक आय बाईकवर दोन दोन पोलीस कर्मचारी तैनात असतील घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने भौतिक पुरावे गोळा करून ते व्यवस्थित सीलबंद करण्यात येतील यानंतर हे पुरावे तपासी अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणार आहे आय बाईकवर विज्ञान शाखेचे ज्ञान असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे त्यांना प्रादेशिक न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील रासायनिक विश्लेषक व वैज्ञानिक सहाय्यकांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे घटनास्थळी तत्काळ पोहोचण्यासाठी दुचाकींचा वापर केला जाणार आहे परिमंडळ निहाय आयोग पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आयबाई पथकातील कर्मचारी कार्यरत राहतील या आइक बाईक कर्मचाऱ्यांची काही कर्तव्य निश्चित केली आहे यामध्ये प्रामुख्याने मुख्य नियंत्रण कक्षातून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रावांना होणे कामकाज पूर्ण झाल्यानंतर स्टेशन डायरी त्याचे नोंद करून ठेवणे शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा करून त्यांची ही नोंद करणे आणि प्रत्येक सोमवारी साप्ताहिक अहवाल सादर करणे या कर्तव्यांमुळे गंभीर गुन्ह्यांवर शास्त्रोक्त पद्धतीने विचार करून त्याचा निकाल लावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे