उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 121 वर पोहोचली असून त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ही दुर्घटना घडवण्याचा कट आखण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही ते म्हणाले. सत्संगासाठी 80 हजार लोकांनाच परवानगी असताना प्रत्यक्षात अडीच लाख लोक तिथे आले होते. अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये नमूद केली आहे. हाथरस जिल्ह्यातील फुलरळी गावात नारायण साकार हरी उर्फ भोले बाबांचा सत्संग होता, सत्संग झाल्यानंतर भोलेबाबा निघाले तेव्हा, त्यांच्या पायाखालची माती घेण्यास भाविक पुढे सरसावले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी हाथरस येथे जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या दुर्घटनेविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली.
Prev Post