माळीवाडा बसस्थानक होणार हायटेक!

माळीवाडा बसस्थानकाची उभारणी १९५४-५५ साली झाली. यानंतर एसटीचा विकास होत गेला. हा विकास काळानुरुप राज्यभर पसरत गेला. जिल्ह्यातही ११ तालुक्यांमध्ये एसटीचे आगार असून, २८ बसस्थानकांची उभारणी त्यात भर घालते, तसेच कार्यशाळा जिल्ह्यात असून, त्यांचेही कामकाज सध्या सुरू आहेत. यातील बऱ्याच बसस्थानक व आगारांचे पुनर्बाधणीची कामे झाली आहेत. त्यात आता माळीवाडा बसस्थानकाची भर पडली आहे. १९५४-५५ नंतर माळीवाडा बसस्थानकाच्या उभारणीपासून आजपर्यंत येथे एसटीतील जिल्ह्यातील विविध भागात बस धावते. माळीवाडा बसस्थानकाच्या इमारतीच्या तळघरात अहमदनगर विभाग नियंत्रक कार्यालय होते. १९७० पर्यंत या ठिकाणावरून जिल्ह्याचा कारभार पाहिला जात होता. त्यानंतर एसटीचा कारभार वाढत गेल्याने हे कार्यालय कमी पडू लागले. त्यानंतर सर्जेपुरा येथे १९७० मध्ये प्रशासकीय इमारत उभारण्यात आल्याने माळीवाडा बसस्थानकातील तळघरातील विभाग नियंत्रक कार्यालय स्थलांतरित झाले. त्यानंतर काही वर्षे माळीवाडा बसस्थानकातील तळघरातील इमारतीत इतर शासकीय कार्यालय सुरू राहिले. माळीवाडा बस स्थानकाच्या नवीन कामासाठी १६ कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामास मंजुरी मिळाली आहे असून, पुढील आठवड्यात जुन्या इमारतीचे निर्लेखनाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर हायटेक कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, असे प्रभारी विभाग नियंत्रक अविनाश साखरे यांनी सांगितले.

नवीन इमारतीत काय काय असणार पहा:

■ आपला दवाखाना

■ महिला विश्रांतीगृह

■ हिरकणी कक्ष

■ वाहक नियंत्रक कक्ष

■ कॅन्टीन व किचन

■ पोस्ट ऑफिस

■ पार्सल रूम

■ दोन जिने

■ महिला व पुरुष प्रसाधनगृह

■ दिव्यांग प्रसाधनगृह

■ दुकाने : नऊ

■ दुचाकी व सायकल वाहनतळ