वंचितच्या वतीने शाखा उद्घाटनाचा झंझावात.

गाव तिथे शाखा उपक्रम

ऋषिकेश राऊत

अहमदनगर प्रतिनिधी :-

श्रद्धेय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन रविवार दि.३/१०/२०२१ रोजी झाले.
यावेळी दोन्ही गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते,नागरिकांसह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा युवा अध्यक्ष संतोष जठार,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संतोष जौंजाळ,जिल्हा सल्लागार जीवन पारधे,शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप,शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण ओरे,राजापूर चे सरपंच संतोष शिंदे,बोरी गावचे माजी उपसरपंच जयेश थोरात,पिसोरे गावचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थोरात,येळपणे गावचे ग्रामपंचायत सदस्य आढाव तसेच येळपणे येथील ज्येष्ठ सल्लागार वसंत नितनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह प्रमोद उजागरे, किरण उबाळे,संभाजी फाजगे,अक्षय फाजगे विजय जौंजाळ,सागर शिंदे,संतोष भोसले आदीसह परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा सल्लागार जीवन पारधे,युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार,जिल्हा महासचिव योगेश साठे आणि श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संतोष जौंजाळ आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार यांनी तालुक्यातील सर्व राजकीय नेतेमंडळी सोयीनुसार राजकारण करत आहे व राजकारणातून सेटलमेंट करुन पैसा कमवत आहेत, गरीब व प्रामाणिक मराठा समाजाचे कार्यकर्ते यांना पुढे येवू दिले जात नाही. वंचित बहुजन आघाडी हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सक्षम उमेदवार देण्यात येणार आहे असे सूचक वक्तव्य केले.
जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी गाव तिथे शाखा या उपक्रम च्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात समाजातील वंचित घटकांना सोबत घेऊन त्यांना सत्तेत जाणार त्याच बरोबर येणाऱ्या नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुका यास्वबळावर लढवणार,ओबीसी आरक्षण,मुस्लिम आरक्षण,गरीब मराठा आरक्षण बाबत पक्षाची भूमिका समाजातील तळागलातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम हे प्रत्येक कार्यकर्त्यांचे आहे.गेल्या एक वर्षापासून दिल्ली येथे केंद्र सरकार मधील शेतकरी विरोधी कायद्या विरोधात आंदोलन सुरू आहे त्याला चिरडण्याचे काम हे केंद्र सरकार करीत आहे.

त्याविरोधात शेतकरी सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडी ने वेळोवेळी आंदोलन, मोर्चे केले तरी या गेंड्याची कातडी असलेल्या सरकार ला सामान्य शेतकरी,शेतमजूर, व सामान्य जनतेचे फसवणूक करीत त्यांच्या भावनाशी खेळत आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना मिळवून या हिटलर शाही ला संपविण्याकरिता आपण सर्व बहुजनांनी आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना सत्तेत पाठविण्याकरीता जनसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्या करिता एकजुटीने काम केले पाहिजे असे प्रतिपादन केले.तसेच बोरी आणि रायगव्हण येथील वंचित बहुजन आघाडी नूतन शाखा पदाधिकारी,सदस्य यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोरी गावचे वंचितचे शाखा अध्यक्ष राजेंद्र आसवले आणि रायगव्हान गावचे वंचितचे शाखा अध्यक्ष नंदा पठारे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर हिवाळे यांनी केले.