जामिआ मोहुम्मदिया बाराबाभळी मदरसा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनानिमित्त बाराबाभळी मदरसा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅली काढण्यात आली व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मद्रासाचे प्राचार्य कारी शादाब, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य नदीम शेख, मतीन सय्यद, आसिफ शेख, नदीम सर, हाजी इरफान, मौलाना अन्वर, मौलाना हंझाला, मुफ्ती इलियास, गालिब शेख आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदरसा मध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढून आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांसाठी प्रार्थना करण्यात आली. व प्रमुख पाहुण्यांनी आपले मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या.