जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन.

भातोडी पारगाव ते टाकळी काझी या अर्धवट रस्त्याचे काम तातडीने सुरू करा अन्यथा कार्यालयात धूळफेक आंदोलन करणार- प्रकाश पोटे

नगर (प्रतिनिधी)- भातोडी पारगाव ते टाकळी काझी दरम्यान मागील ४ महिन्यापूर्वी ८ कोटी रुपये निधीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते परंतु मध्यंतरी पावसामध्ये काम थांबल्यानंतर अद्यापर्यंत काम सुरू होणे अपेक्षित होते यात महत्त्वाचे कारण म्हणजे रस्त्यावर यापूर्वी पाणी साचत असल्याने आपल्या विभागाच्या वतीने तातडीने रस्त्याची उंची वाढवण्यासाठी जी २ स्वरूपाचे खडीकरण मुरुमीकरण केले आहे मात्र त्या मुरुमीकरणावरून अवजड वाहनांची ये जा होऊन सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा असणारी सर्व शेतीचे पिके हे धुळीमुळे नुकसानग्रस्त झालेले आहे तसेच खडीकरण उघडे पडल्याने रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या टायरने खडे उडून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना लागत असून छोटे-मोठे अपघात देखील होत आहे तसेच या खडीमुळे एखादा गंभीर स्वरूपाचा अपघात देखील होऊ शकतो त्यामुळे तातडीने या सर्व बाबीची चौकशी करून या रस्त्यावर तातडीने पाणी मारण्याची व्यवस्था करावी तसेच संबंधित ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे या मागणीसाठी बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी के.बी.शेळके यांना निवेदन देताना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहबाज शेख, रवी पवार, अशोक बनसोडे, दीपक गुगळे, अमित गांधी अदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अन्यथा ८ दिवसानंतर संघटनेच्या वतीने बांधकाम विभागाच्या कार्यालयात याच रस्त्याची धूळ आणून धूळफेक आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.