जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.

कर्जत तहसीलदार गणेश जगदाळे व उपविभागीय अधिकारी नितीन कुमार पाटील यांनी वाटप दरखास्त न्यायालयात प्रलंबित असताना उताऱ्या वरती बेकायदेशीरपणे नोंदी घेण्याचा आदेश केल्याचा आरोप.

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत जिल्हा अहमदनगर येथील मौजे जलालपूर येथील गट नं. १८२/१,१८२/२,१८२/३ व १८२/४ ही मिळकत अनंता राजाराम तांदळे, काळू राजाराम तांदळे, नवनाथ विठ्ठल शिंदे, जयश्री भास्कर मुदळ, छाया बापू मुदळ, अनिता प्रभाकर गुंजाळ, चंद्रकांत ज्ञानदेव सुरवसे, शकुंतला अंकुश विटकर, सोजल महादेव विटकर, मोहन हनुमंत नन्नवरे, एकनाथ हनुमंत नन्नवरे आमच्या वडिलोपार्जित मालकी हक्क कब्जे वहिवाटीच्या आहेत. व सदर मिळकतीबाबत कर्जत येथील दिवाणी न्यायालयात वाटप करिता सरस्वती पवार यांनी दाखल केलेले आहे व सदर निकालाविरुद्ध श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. सदर दाव्याचा एकतर्फानी काल होऊन सदर दाव्याच्या निकालाच्या आधारे दरखास्त तहसीलदार कर्जत यांच्याकडे दाखल आहे व सदर दरखस्तीमध्ये मूळ वादी सरस्वती पवार मयत असून प्रतिवादी राजाराम भोजा तांदळे, सुमन तांदळे, पारूबाई शिंदे या तिघेही मयत आहे. त्यांचे वारस सदर दरखास्त मध्ये रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही व वाटप तक्ता झालेला नाही तसेच मोजणी व फाळणी देखील झालेली नसून असे असतानाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी २६-०९-२०२३ रोजी मनोहर यादव यांच्या सांगण्यावरून तहसीलदार यांच्याशी आर्थिक तडजोड करून सातबारा उताऱ्यावरील वादी व प्रतिवादी यांच्या वारसाची नोंदी घेण्याबाबत आदेश केला व सदर आदेशात कोरटवाटपदरखास्त जलालपूर यामध्ये न्यायालयाचे आदेशानुसार अंतिम वाटप तक्ता व नकाशा तयार झाल्यानंतर वाटपाचे कार्यवाही पूर्ण करून अंतिम आदेश पारित करण्यात येईल दावा मिळकत मध्ये कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणांची नोंद करण्यात येऊ नये असे तहसीलदार कर्जत यांनी केलेल्या आदेशात नमूद केलेले आहे तरीही तहसीलदार यांच्या आदेशावरून गावचे सातबारा रेकॉर्डला फेरफार ७४८५ प्रमाणे नोंद करण्यात आलेली आहे. तसेच काळूराम राजाराम तांदळे यांनी आरटीएस अपील दाखल केलेली आहे. सदर अपीलामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी न घेता उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी २८-०३-२०२४ रोजी दोन्ही अपिले निकाली काढले व सदर अर्जदार यांना सदर अपिलामध्ये कोणत्याही प्रकारचे म्हणणे देण्याची संधी न देता उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी सदर अपिलाच्या निकालामध्ये तहसीलदार कर्जत यांनी मौजे जलालपूर येथील इतर हक्कातील वाटपाची कार्यवाही पूर्ण करून अंतिम आदेश पारित करण्यात येवून दावा मिळकत मध्ये कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणास बंदी असा शेरा कमी करण्यात यावा असा उपविभागीय अधिकारी यांनी आदेश केला व शेरा कमी केला आहे. व मनोहर यादव यांनी पारूबाई आप्पा शिंदे व चतुराबाई हनुमंत ननवरे यांच्या नावावरील संपूर्ण शेत्र त्यांना फसवून खरेदी खताने स्वतःच्या नावे करून घेतलेले आहे सदर खरेदीखत करण्यास उपविभागीय अधिकारी कर्जत नितीन पाटील व गाव कामगार मकरे व मंडळ अधिकारी बेलेकर यांनी मदत केलेली असून सदर उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या निकालाच्या विरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपील दाखल केले असून सदर अपीलामध्ये इस्टे असताना कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सदर फेरफार ७४८५ हा मंजूर केलेला आहे. सदरचे खोटे व बनावट कागदपत्र तयार करण्यास व खरेदी खते तयार करण्यास तहसीलदार गणेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी कर्जत नितीन पाटील व गाव कामगार तलाठी मखरे, मंडळ अधिकारी बेलेकर या सर्वांनी मिळून बेकायदेशीरपणे कागदपत्र तयार करण्यास मदत केलेली आहे व त्यांच्या मदतीमुळे सदरची बेकायदेशीर खरेदी खते झालेली आहे त्यामुळे वरील प्रकरणाची चौकशी समिती नेमण्यात येऊन सदर चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी व सदर चौकशीमध्ये दोषींवर कारवाई करण्यात यावी व सदरचे झालेले बेकायदेशीर आदेश तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करतांना अनंता तांदळे, काळू तांदळे, नवनाथ शिंदे, जयश्री मुदळ, छाया मुदळ, अनिता गुंजाळ, चंद्रकांत सुरवसे, शकुंतला विटकर, सोजल विटकर, मोहन नन्नवरे, एकनाथ नन्नवरे आदी उपस्थित होते.