जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य व रक्त तपासणी.

वाढते साथीचे आजार व व्हायरल इन्फेक्शनचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यासाठी काळाची गरज- मुदस्सर शेख.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंद नगर बॉम्बे हॉस्पिटल जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक मित्र मंडळ व जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉ शेख रियाज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी अतिफ शेख, डॉ.मेहवश साहिल शेख, डॉ. अश्पाक पटेल, डॉ.अहद रियाज अहमद शेख, डॉ.हसीना मुदस्सर, डॉ.आलिया शेख, राहुल कडूस, बाळू इदे, दिनेश लोंढे, सागर फुलारी, अरबाज शेख, वैशाली कुलकर्णी, दीपक चौरे आदी मुकुंद नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष डॉ.शेख रियाज म्हणाले की, नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून त्यादृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून धावपळीच्या जीवनात आरोग्य कडे दुर्लक्ष होते मात्र वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येत असल्याची भावना व्यक्त केली. तर आयोजक माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक म्हणाले की, महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधेचा खर्च पेळवत नसल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असुन सध्या वाढते साथीचे आजार व्हायरल इन्फेक्शन चे प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याची भावना व्यक्त केली. व उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय, संपूर्ण सुरक्षा केंद्र, डी एस आर सी एकात्मिक सल्ला समुपदेशन चाचणी केंद्र व राजपती महालॅब यांनी सहकार्य केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबील सय्यद यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका फरीदा शेख यांनी मानले.