कौशल्य विकास केंद्राचा लाभ शहर व ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा !

अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्राचे उद्घाटन आभासी पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी २० सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. यासाठी अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर तर्फे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य नाविन्यता रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहमदनगर यांच्याबरोबर सामंजस्य करार केलेला आहे .या अंतर्गत डोमेस्टिक डाटा एन्ट्री आणि जी.एस.टी असिस्टंट हे दोन नवीन कोर्सेस चालणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यधिष्टीत अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. अहमदनगर महाविद्यालय नेहमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील नविन संधी उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर. यांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवहन प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी केले. तसेच अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.भागवत परकाळ व प्रा.डॉ तुषिता आय्यर यांच्याशी विद्यार्थ्यांनी संपर्क करावा असे ते म्हाणाले .