दिल्लीला मिळणार नवीन मुख्यमंत्री; केजरीवाल देणार राजीनामा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसानंतर राजीनामा देणार असल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला आहे. दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल रविवारी आपच्या मुख्यालयात बोलत होते. ते म्हणाले, दोन दिवसांत आमदारांच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड केली जाईल. मला जनतेच्या दरबारात अग्निपरीक्षा देण्याची इच्छा आहे. जनतेला आम्हाला प्रामाणिक जाहीर केल्यानंतरच खुर्चीवर बसेल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तूर्त पदाची सूत्रे घेणार नाहीत. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची मागणी केली. वास्तविक दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत निवडणूक होईल. गैरभाजप सीएमला माझे आवाहन आहे. पीएमनी खोट्या खटल्यात तुरुंगात डांबल्यास राजीनामा देऊ नका. राज्यघटना सर्वोच्च आहे. भाजपने केजरीवाल यांच्या घोषणेला नाटक संबोधले. प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी म्हणाले, त्यांचे हे इमोशनल कार्ड आहे.
■ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिली तर याचे कारण लवकर सांगणार असून, दिल्ली सरकार लवकर निवडणूक घेण्यासाठी योग्य कारण सांगून तसे आयोगाला कळवेल. आयोग महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये निर्णय करू शकतो. परंतु जानेवारीत दिल्लीत मतदार यादी अपडेट होईल. म्हणून आयोग नियोजित वेळेतच निवडणूक घेऊ शकते.
■ सुनीता केजरीवाल, आतिशी आणि गोपाल राय नवे मुख्यमंत्री शक्य
अरविंद केजरीवालांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता नवीन नावाच्या चर्चेस सुरूवात झाली. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल लोकसभा निवडणुकीत जाहीर सभा घेतल्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीतही त्या खूप सक्रिय राहिल्या. आतिशी सिंह यांच्याकडे १४ मंत्रालयांचा कार्यभार आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर आतिशी यांनी दिल्ली सरकारची धुरा सांभाळली. केजरीवालांचे विश्वासू गोपाल राय, सौरभ भारद्वाज यांची नावेही चर्चेत आहेत.