रत्नागिरी : काही दिवसांपासून कोकणामध्ये तुफान पाऊस सुरू झालेला आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी रात्रीपासून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोकणातील जगबुडी, कुंडलिका, वशिष्ठी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी आता आजूबाजूच्या गावांमध्ये शिरायला हळूहळू सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या काही तासांमध्ये चिपळूण आणि खेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येथील स्थानिक यंत्रणा सतर्क झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात रविवारी दिवसभरात मंडणगड तालुक्यात १३९.८० मिमी सरासरी तर चिपळूण तालुक्यात ७६.७० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर येऊन नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. खेड, दापोली मार्गावर असलेल्या नारंगी नदीलादेखील पूर आल्यामुळे खेड, दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. सध्या जगबुडी नदी नऊ मीटर पातळीच्या खालून वाहते आहे. ओढवलेली ही पूर परिस्थिती पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी म्हणजे आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शाळकरी मुलांना या परिस्थितीतून वाचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा विद्यालय, महाविद्यालयांना आज म्हणजे सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
Prev Post