कोपर्डी येथील मयत समाधान शिंदेच्या आरोपींच्या अटकेसाठी कोपर्डीत उपोषण

कोपर्डी येथील मयत समाधान शिंदे मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी होणार

अहमदनगर :
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मयत समाधान शिंदे यांचा मृत्यूप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊन गुन्हेगाराला जाणीवपूर्वक अटक केली जात नाही, कारण या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपीबरोबर कर्जत पोलिस स्टेशनच्या काही पोलिसांनी देखील समाधान शिंदे याला मारहाण केलेली आहे. त्या मारहाण केलेल्या आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच ज्या पोलिसांनी समाधान शिंदे याला मारहाण केली. त्या पोलिसांची चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. कोपर्डी या गावातील मागासवर्गीय समाजाला पूर्वी कोपर्डीमध्ये झालेल्या घटनेमुळे टार्गेट केले जात आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवताना फिर्यादीची दिशाभूल करून आरोपीला अभय दिलेले आहे. त्यामुळे कोपर्डीतील मागासवर्गीय समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पोलिसांना हाताशी धरून गुन्ह्याचे स्वरूप बदलण्याचे काम ते करीत आहेत. म्हणून हा गुन्हा सी.बी.आयकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी,अहमदनगर दक्षिणच्या वतीने करण्यात आली आहे.
समाधानच्या खून प्रकरणी कोपर्डी गावातील सर्व मागासवर्गीय समाज बांधव व समाधानाचे कुटुंबीय ४ ते ५ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत . तरी या उपोषणाची आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही. तरी उपोषणास बसलेल्या व्यक्तीची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा , गुन्हा लवकरात लवकर सी.बी.आय कडे चौकशी कमी वर्ग करण्यात यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आलीय.या मागणीचे निवेदन देखील देण्यात आलं आहे.
 
यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मा.प्रतिक बारसे, मा.योगेश साठे, मा.जग्गू गायकवाड,आकाश शिंदे,फैररोज पठाण,अमर निर्भवणे,वैभव पारधे आदीसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.