११ डिसेंबरपासून पोस्ट खात्यातील नियम बदलणार

डाक विभागातर्फे खातेदारांना आवाहन

अहमदनगर :  

आता ११ डिसेंबर २०२० पासून पोस्ट खात्यामध्ये किमान ५०० रुपये ठेवणे सक्तीचे करण्यात आलं आहे.   त्यामुळे सर्व पोस्ट ऑफिस मधील सेविंग बँकेचे खातेदार असणाऱ्यांना किमान ५०० रुपये आपल्या खात्यात ठेवावे अशी विनंती डाक खात्यातर्फे करण्यात आली आहे.  खातेदारांच्या खात्यात  ५०० पेक्षा कमी रक्कम असेल तर खात्यातून metenance  चार्जे म्हणून १०० रुपये कट केले जातील आणि खात्यात जर फक्त १०० च रुपयेच शिल्लक असतील तर ते खातं आपोआप बंद करण्यात येणार आहे.  यांची सर्वानी नोंद घ्यावी असं आवाहन डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जे. टी  भोसले यांनी केलं आहे.