रंगारगल्लीतील लाडक्या बहिणींनी बांधल्या आमदार संग्राम जगताप यांना राख्या

आमदार जगताप यांनी दिल्या सर्व महिलांना भेटवस्तू

बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा रक्षाबंधन आदर्शवत सण – आमदार संग्राम जगताप

नगर- रक्षाबंधन हा भाऊ-बहिण यांच्या प्रेमाचा संदेश देणारा सण देशामध्ये आनंदात साजरा होत आहे. बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण आदर्शवत आहे. राखी बहिणीचे प्रेम आणि तिच्या भावाच्या कल्याणासाठी प्रार्थना यांचे प्रतीक आहे. भाऊ, त्या बदल्यात, भेटवस्तू देतो आणि त्यांच्या बहिणींचे संरक्षण आणि काळजी घेण्याचे वचन देतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

रंगारगल्ली येथील लाडक्या बहिणींनी आमदार संग्राम जगताप यांना राख्या बांधल्या. यावेळेस ते बोलत होते. यावेळी सौ.सुरेखा दंडी, सौ.आरती आढाव, सौ.उज्वला भांगे, सौ.योगिनी सातपुते, सौ.पल्लवी मोडक आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन भेट म्हणून साड्या देण्यात आल्या.
पुढे बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की , शहर विकासासाठी 150 कोटी निधी आपण मंजूर करून आणलेला आहे. शहरात अनेक भागात रस्त्याचे आणि अनेक विविध कामे सुरू झालेले आहेत. या रक्षाबंधन निमित्ताने मी आपणास वचन देतो इथून पुढच्या काळात उद्योगधंदे वाढीसाठी नगरशहरामध्ये मोठ्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच नगरशहर भयमुक्त म्हणुन नावारुपाला येईल, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात रवी दंडी म्हणाली, रंगार गल्ली परिसरातील अनेक विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावल्याने येथील येथील महिलांनी आमदार संग्राम जगताप यांना राख्या बांधून आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली.
यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक महिलांनी आमदार संग्राम जगताप यांना ओवाळणी करून राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी दंडी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.योगिनी सातपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी दंडी, चेतन मोडक, गजेंद्र कवडे, अजिंक्य गुरावे यांनी विशेष परिश्रम घेतले