अहमदनगर :
नगर पाथर्डी रोडवर चांदबीबी महाल परिसरात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला असल्याची बातमी काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. यामुळे नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होते. मात्र हि क्लिप नगर परिसरातील नसल्याचे निसर्गमित्र मंदार साबळे यांनी सांगितलं आहे, अश्या क्लिप व्हायरल करून नागरिकात भीती पसरविल्यास कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिलाय. याबाबत दिवसभर साबळे यांना अनेकांनी क्लिपच्या सत्यतेबाबत विचारणा केली. या क्लिपमध्ये हल्ला करणारे जनावर बिबट्या नसून पट्ट्यांचा वाघ आहे. नगर जिल्ह्यात पट्टेरी वाघ आढळतच नाहीत, त्यामुळे हि क्लिप कोणीही फॉरवर्ड करू नये असं आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी केलं आहे, असं आढळ्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. चांदबीबी परिसरात जे बिबट्या आढळलेत त्यांनी कुणावरही हल्ला केला नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरू नये ,मात्र परिसरात वावरताना काळजी घ्यावी अशी माहिती थेटे व साबळे यांनी दिलीय.