लाच घेणारा  आरोपी रेड हँडेड पकडली 

लाचलुचपत विभागाची कारवाई 

अहमदनगर:

           संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारदार  आरोग्य सहाय्यक आजारपणामुळे १ सप्टेंबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५  या काळात रजेवर होते. या काळातील वेतन  त्यांना मिळाले नव्हते. या वेतनाच्या मागणीसाठी तक्रारदाराने २०१९ मध्ये  अहमदनगरच्या जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या कडे अर्ज दाखल केला होता. त्यावरून अधिकाऱ्यांनी रजेच्या  कालावधीतील वेतन म्हणून १लाख ३९ हजार रुपये काढून तक्रारदारांच्या बँकेच्या खात्यात १९ नोव्हेंबर २०२० रोजी  जमा  केली होती. त्याचे वेतन काढल्याच्या कामामुळे आरोपी लोकसेविका डॉ. रजनी खुणे यांनी तक्रारदाराकडे परस्पर वेतनाच्या रकमेच्या ६० टक्के रक्कम मागितली.

 

            तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यांनतर २६ नोव्हेंबर २०२० ला लाच मागणी ची कायदेशीर पडताळणी करण्यात आली.या पडताळणीत लोकसेविकेने पंचासमक्ष बिलाच्या रकमेच्या ६० टक्के रक्कम लाच मागितली होती हे सिद्ध झाले. या पडताळणीसाठी चितळे रोडवरील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. यावेळी लोकसेविकेला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगे हाथ पकडण्यात आले. या कारवाई साठी पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे, यांनी मार्गदर्शक अधिकाऱ्यांच्या निदर्शना खाली हि कारवाई केलीय.