37- अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवारांनी दाखल केले 32 नामनिर्देशनपत्र

नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी

अहमदनगर दि. 25 (जि.मा.का.):- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 32 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेले 27 उमेदवार व यापूर्वी नामनिर्देशन पत्रदाखल केलेले 16 उमेदवार अशा प्रकारे नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 43 एवढी झाली आहे.
नामनिर्देशनपत्र भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), दोन नामनिर्देशनपत्र, डॉ यो‍गिता प्रविण चोळके (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, उमाशंकर श्यानमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी) एक नामनिर्देशनपत्र, सुर्यभान दत्तारत्रय लांबे (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, जहीर युसुफ जकाते (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र व भारतीय जनता पार्टीतर्फे एक नामनिर्देशनपत्र, शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी) एक नामनिर्देशनपत्र, कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष) एक नामनिर्देशनपत्र, शितोळे सुदर्शन लक्ष्मलण (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र व हिंदू एकता आंदोलन पार्टी एक नामनिर्देशनपत्र, शेकटकर अनिल गणपत (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, मुक्ता प्रदीप साळुंके (इंन्सालनियत पार्टी) एक नामनिर्देशनपत्र, मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी) एक नामनिर्देशनपत्र, आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लीदकन पार्टी) एक नामनिर्देशनपत्र, दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी) एक नामनिर्देशनपत्र व (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, निलेश साहेबराव लंके (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी) एक नामनिर्देशनपत्र, गंगाधर हरिभाऊ कोळेकर (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, प्रविण सुभाष दळवी (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, मनोरमा दिलीप खेडकर (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, बिलाल गफुर शेख (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, प्रतिक अरविंद बारसे (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, राणी निलेश लंके (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, परवेज उमर शेख (ऑल इंडिया मजलिस-इत्तेफहादुल मुस्लिमीन) एक नामनिर्देशनपत्र, शेळके विश्वेनाथ श्रीरंग (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, शरद बाबुराव माघाडे (अपक्ष) एक नामनिर्देशपत्र, हनुमंत देविदास पावणे (अपक्ष) दोन नामनिर्देशनपत्र उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले.
यापुर्वी दि.22 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीन नामनिर्देशनपत्र, डॉ. कैलाश निवृत्ती जाधव- महाराष्ट्र विकास आघाडी एक नामनिर्देशन पत्र, भागवत धोंडीबा गायकवाड-समता पार्टी एक नामनिर्देशनपत्र तर ऍड.महंमद जमीर शेख-अपक्ष यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.
दि. 23 एप्रिल निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी दोन नामनिर्देशनपत्र, वाबळे भाऊसाहेब बापूराव (भारतीय जवान किसान पार्टी) एक नामनिर्देशनपत्र,नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी) एक नामनिर्देशनपत्र,गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
दि. 24 एप्रिल रोजी मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टु रिकॉल पार्टी) यांनी एक नामनिर्देशनपत्र, कोठारी रवींद्र लिलाचंद (अपक्ष) दोन नामनिर्देशनपत्र, अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, प्राजक्तअ प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्टव कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) तीन नामनिर्देशनपत्र, महेंद्र दादासाहेब शिंदे (वंचित बहुजन आघाडी) एक नामनिर्देशनपत्र व अपक्ष एक नामनिर्देशनपत्र, गावडे मच्छिंद्र राधाकिसन (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र तर पानसरे छगन भिकाजी (अपक्ष) एक ना‍मनिर्देशनपत्र दाखल केले.
26 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.