श्री.माहेश्वरी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.विशाल झंवर व सचिवपदी श्री.शेखर आसावा 

श्री. माहेश्वरी युवा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न  

https://metronews.co.in/zee-yuva-sanman/अहमदनगर :

श्री.माहेश्वरी युवा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष श्री.अमित काबरा यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महेश पूजन करण्यात आले.

सभेत सर्वानुमते झालेल्या चर्चेत श्री.विशाल झंवर यांची श्री.माहेश्वरी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी व सचिवपदी शेखर आसावा यांची निवड करण्यात आली.  यावेळी त्यांचा माजी अध्यक्ष अमित काबरा व माजी  सचिव  शाम भुतडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

 

सचिव शाम भुतडा यांनी सर्वांचे स्वागत केले व गत वर्षातील उपक्रमांची माहिती दिली.खजिनदार सी.ए.अनिकेत बलदवा यांनी सादर केलेल्या सन २०१९ – २० च्या ताळेबंदास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

अमित काबरा यांनी विविध उपक्रमात सर्वांनी दिलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले.तसेच नूतन कार्यकारणीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

नूतन अध्यक्ष श्री.विशाल झंवर यांनी यावेळी सांगितले की, आपण दिलेली जबाबदारीची जाणीव ठेवून येत्या काळात युवा संघटन अधिक बळकट व सक्षम करण्यात येईल.  युवकांना नवी दिशा व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी उपक्रम राबविले जातील. सध्याच्या कोरोना साथीच्या परिणामाची जाणीव ठेवून समाज व परिवार सूरक्षा जोपासून जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी लवकरच मोहीम राबविली जाईल.

उपस्थित मुकुंद धूत,श्री.मनिष सोमाणी,श्री.अतुल डागा,श्री.किरण मनियार यांनी नवीन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.उपस्थित सभासद, मार्गदर्शक,विविध उपक्रमांना सहकार्य करणारे मान्यवर व सभासद या सर्वांचे सचिव शेखर आसावा यांनी आभार मानले.

 

गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीची धडक कारवाई  जोरदारपणे सुरू आहे.  अभिनेता अर्जुन रामपालची  लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सला शुक्रवारी 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
एनसीबीच्या समन्सनुसार गॅब्रिएला डेमेट्रियड्स चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.  आज 12 नोव्हेंबरला पुन्हा एकदा तिला प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत.  तर, शुक्रवारी अर्जुन रामपालची चौकशी होणार आहे.
 बुधवारी 11 नोव्हेंबरला तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती.  यावेळी पुन्हा एकदा गॅब्रिएलाची चौकशी होण्याची शक्यता वर्वण्यात आली होती.  बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्यांची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्स यांना एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

*माझेकुटुंब_माझीजबाबदारी*