महसूल सप्ताहात अहमदनगरमध्ये योजनांचा होणार जागर

अहमदनगर : जिल्ह्यात एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार आहे. या काळात विविध शिबिरांच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. श्रमिक बालाजी देवस्थानचा वार्षिक महोत्सवानिमित्त व्यंकटेश कल्याण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात सव्वा रुपयात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केला जाणार आहे. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाकडून महसूल पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये 1 ते 7 ऑगस्टमध्ये जिल्ह्यात महसूल सप्ताहात विविध शासकीय योजनांबाबत शिबिरही घेतली जाणार आहेत.4 ऑगस्ट रोजी बाल रंगभूमी परिषद जिल्हा शाखेतर्फे बाल कलावंतांसाठी लोककला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. यासाठी माऊली सभागृह अहमदनगर हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान घेतले जाणार आहे.याशिवाय 6 ऑगस्ट रोजी, सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील प्रशासनसंदर्भात आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच 7 ऑगस्ट रोजी शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित आघाडीचा ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे. याशिवाय 9 ऑगस्ट रोजी, सकाळी साडेअकरा वाजता अहमदनगरच्या गांधी पुतळ्याजवळ विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्ह्याचे निर्मिती करण्याच्या मागणीसाठी जेल भरो आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे. तर 15 ऑगस्टनिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी पोलीस परेड मैदान, अहमदनगर या ठिकाणी येण्याच आवाहनही करण्यात आलेले आहे. यासाठी सकाळी सव्वा आठची वेळ निश्चित करण्यात आलेली असून, 15 ऑगस्ट याच दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग संदर्भातला प्रश्न मार्गी न लागल्यास कर्मचारी युनियन उपोषणाचा इशारा दिलेला असून यासाठी सकाळी 10 वेळ निश्चित करण्यात आलेली असून महानगरपालिका कार्यालयाचे ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे.