मंगलगेटच्या रणजीत तरुण मंडळाने साकारला अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा देखावा
महिलांचा सन्मान करणे, हे संस्कार सर्व समाजात रुजले पाहिजे -शीलाताई शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या रणजीत तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त साकारलेला अयोध्या येथील भगवान श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सर्व भाविकांचे लक्ष वेधत आहे. या गेणेशोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करुन मंडळाने महिलांना विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचा मान दिला आहे. यावेळी डोक्यावर फेटे बांधून मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.
देखाव्याचे उद्घाटन माजी महापौर शिलाताई शिंदे व क्रिकेटपटू परमेश्वरी संग्राम जगताप हिच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव, कांचन सिद्ध, शोभा हुंडेकरी, नीता वाडेकर, विद्या वाडेकर, मनीषा कर्पे, पूजा वाडेकर, सोनाली भिंगारे, संतोषी वाडेकर, वैशाली वाडेकर, कविता काळे, कोमल काळे, नीलिमा भालेकर, संगीता चवालिया, नैना चवालिया, कल्याणी चवालिया आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रारंभी महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर पारंपारिक ढोल पथकाच्या वादनाचा आनंद उपस्थित भाविकांनी लुटला. उद्घाटनानंतर फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली होती.
शीलाताई शिंदे म्हणाल्या की, महिलांना मान-सन्मान देणारा आदर्शवत उपक्रम रणजीत तरुण मंडळाने राबविला आहे. महिलांचा सन्मान करणे, हे संस्कार सर्व समाजात रुजले गेले पाहिजे. चूल व मूल पर्यंतच मर्यादीत न राहता उंबरठा ओलांडून महिला आपले कर्तृत्व गाजवत आहे. नवरात्र उत्सव व गणेशोत्सवात एकत्र येऊन महिला स्त्री शक्तीचा जागर करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अश्विनी जाधव म्हणाल्या की, स्त्रीशक्तीवर समाज आधारलेला आहे. मंडळाने महिलांना सन्मान देऊन स्त्री सन्मानाची नांदी पेरली आहे. तर अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती सर्व भाविकांना अयोध्येत आल्याचा भास निर्माण करत असल्याचे स्पष्ट केले. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरु असून, मंडळाचे अध्यक्ष अक्षय भिंगारे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य योगदान देत आहेत.