चायना मांजा किती भयंकर आहे.. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावे यासाठी सीताराम सारडा विद्यालयात, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

‘करू सण आनंदाने साजरा’

नगर – चायना मांजा किती भयंकर आहे.. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावे म्हणून नुकताच हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करू सण आनंदाने साजरा हा कार्यक्रम चेअरमन अजित बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. याप्रसंगी पक्षीमित्र तुषार लहारे उपस्थित होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या मांज्याचे दुष्परिणाम सांगत कधीही विघटन न होणारा हा परदेशी मांजा म्हणजे प्राणी, पक्षी आणि मानवासाठी शापच आहे. पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा हा मांजा पतंग उडविणार्‍याला देखील त्रासदायक आहे. अनेकांचे हात, डोळे, कान असे अवयव या मांजाने कापले असून संक्रांती सारख्या आनंदी उत्सवात अशा त्रासदायक वस्तूचा समावेश नसावा हे आवर्जून सांगितले.
याप्रसंगी लहारे यांनी झाडावर लटकलेले मृत पक्षी, अपंग प्राणी यांचे केवळ अशा प्लास्टिक पासून बनवलेल्या चायना मांजा मुळे भयंकर अपघात होतात. रस्त्यावर गाडीवर जाणार्‍या व्यक्तीचे हात, गळा या मांजाने चिरलेला आम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे. कधीही भरून न येणारे नुकसान अशा मानजांमुळे होतो. म्हणून या संक्रांतीला आपण हा मांजा न वापरण्याची शपथ घेऊया. मांजा विकणारा, साठविणारा आणि वाहून नेणारा देखील अपराधीच आहे. आपल्याकडे मांजा सापडल्यास मोठ्या पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः हा चायना मांजा न वापरता इतरांना देखील वापरण्यापासून रोखावे. ही पक्षीमित्र संघटनेच्या वतीने या ठिकाणी विनंती करीत आहे. असे सांगत चायना मांजामुळे  झालेल्या अनेक भयंकर अपघाताची उदाहरणे सांगितली.
कलाशिक्षक अशोक डोळसे यांनी आपण खाऊन टाकली चिंगम  पक्षांच्या चोचीत अडकते आणि ती उपाशी मरतात त्यामुळे चिंगम सारखा पदार्थ न खाता पक्षी मित्र बनावे हे आवर्जून सांगितले.
याप्रसंगी पर्यवेक्षक गोविंद धर्माधिकारी  क्रीडाशिक्षक सुनील कुलकर्णी, नितीन केने सौ. योजना वाघमारे, सौ शितल शिंदे, सौ. वैशाली पिसे. सौ. वृशाली जोशी, आनंद जोशी व मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. मान्यवरांचे आभार व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती क्रांती मुंदनकर मॅडम यांनी मांडले.