ऑलिंपिकमध्ये भारताने मिळवले पहिले कांस्यपदक

यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. नेमबाज मनु भास्करने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली. यासह ऑलम्पिक पदक जिंकणारी म्हणून ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत मनूने 221.7 गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकनंतर भारताला नेमबाजीत हे पहिलेच ऑलम्पिक पदक मिळाले आहे. तर अभिनव बिंद्रा, राज्यवर्धनसिंग राठोड, विजयकुमार आणि गगन नारंग यांच्या नंतर मनू भास्कर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पाचवी भारतीय ठरली आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुला फोन करून त्याच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.