अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर

८ दिवसानंतर जामीन मंजूर 

नवी दिल्ली : 

अन्वय गोस्वामी आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  अर्णब गोस्वामी यांना तब्बल ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.  सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  अर्णब गोस्वामी सध्या तळोजा जेलमध्ये आहेत.

अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव होतं. या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली होती.

या प्रकरणाची वेळीच चौकशी झाली नाही. असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटूंबियांनी केला होता.  सत्याच्या मागे उभे राहा, असं आवाहन नाईक कुटूंबियांनी केलं होतं.  तर दुसरीकडे भाजपा आमदार राम कदम यांनी अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी उपोषण सुरु केलं होतं.