मनसेकडून संजय राऊत यांना सणसणीत चपराक 

राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई :

 

शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होत. त्यालाच हे उत्तर देण्यात आलं आहे .
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाकून कोपरापासून दंडवत घालताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’, अशी चपखल कॅप्शन संदीप देशपांडे यांनी फोटोच्यावरती लिहली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, हे पाहावे लागेल.

संजय राऊत यांनी राजभवन म्हणजे फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टीका केली होती. या टीकेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रचंड दुखावले गेले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संजय राऊत यांनी राज्यपालांना कोपरापासून दंडवत केला होता. भगतसिंह कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणून मी असा नमस्कार केला, असे राऊत यांनी सांगितले होते. मात्र, आता मनसेकडून याच फोटोचा वापर करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

घातक शस्त्र व अंबर दिव्यासह डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी केला आरोपी जेरबं

दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव रात्र कष्ट करत असताना त्यांना गुप्त बातमी दादा मार्फत माहिती मिळाली की टाकळी खंडेश्वरी येथील सपकाळ वस्ती येथे दत्तू मुरलीधर सकट हा विनापरवाना बेकायदा घातक दोन लोखंडी तलवारी स्वतःचे घरात व गाडीत जपून ठेवले आहेत. सदरची माहिती मिळताच गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी जाधव यांनी तात्काळ त्यांच्याकडील पोलीस कर्मचाऱ्यांची पथकाला बोलावून टाकळी खंडेश्वरी गावातील सपकाळ वस्ती येथे जाऊन आरोपीचे राहते घराची व त्याचे घरासमोर लावलेली फिक्कट पांढर्‍या रंगाची टाटा सफारी गाडी नंबर एम एच सोळा 48 33 याची झडती घेतली असता या गाडीमध्ये लोखंडी धातूची पितळाच्या धातूची मूर्ती असलेली तलवार व एक नारंगी रंगाचा अंबर दिवा तसेच त्याचे घरात लोखंडी धातूची मूर्ती असलेली सिल्वर कलर असलेली तलवार मिळून आली आहे सदर आरोपी ताब्यात मिळालेल्या मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल आदित्य बेडेकर यांचे फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन मध्ये 14 ऑब्लिक 25 व गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
              सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार गौतम फुंदे, पोलीस नाईक केशव व्हरकटे, पो. कॉ. हृदय घोडके, पो. कॉ. सागर जंगम, पो. कॉ. आदित्य बेलेकर, पो. कॉ. गोवर्धन कदम, पो. कॉ. वैभव सुपेकर, चालक पो. कॉ. दादाराम म्हस्के, महिला पो. कॉ. रत्नमाला हराळे, पो. कॉ. मच्छिंद्र जाधव, पो. कॉ. संतोष साबळे या सर्वांनी केली असून वरील आरोपीने अंबर दिव्याचा व घातक शस्त्रांचा वापर करून आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रबोध हंचे कर्जत पोलिस स्टेशन हे करत आहेत.
https://youtu.be/3ieH1jYPgIE