पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर घणाघात 

जवानांच्या हौतात्म्यावर देशात घाणेरडे राजकारण 

 

नवी दिल्ली :

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. आज मी येथे अर्धसैनिक दलाची परेड पाहत असताना माझ्या डोळ्यापुढे एक चित्र तरळले. हे चित्र होते पुलवामा हल्ल्याचे. जेव्हा आपले वीरपुत्र जाण्याने संपूर्ण देश दु:खी होता, तेव्हा काही लोक त्या दु:खात सहभागी नव्हते, ते पुलवामा हल्ल्यात आपला राजकीय स्वार्थ पाहत होते, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधी पक्षांवर हल्ला चढवला.

जवानांच्या हौतात्म्यावर देशात घाणेरडे राजकारण 

जेव्हा देशावर मोठा आघात झाला होता, तेव्हा स्वार्थ आणि अहंकाराने भरलेल्या घाणेरड्या राजकारणाने किती टोक गाठले होते, असे मोदी यावेळी म्हणालेत . माझ्या हृदयावर मोठी जखम होती. परंतु शेजारी देशामधून जे वृत्त आले, जे त्यांनी स्वीकार केले, त्यामुळे या पक्षाचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी मोदी बोलताना म्हणालेत .
पाकिस्तानातील इम्रान खान सरकारमधील एक मंत्री फवाद खान यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली पाकिस्तानी संसदेत दिली. या कबुलीचाच उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केलाय.
https://youtu.be/mg57LlhfyKc