शहरातील मूर्ती कारखान्यांची महानगरपालिकेच्या वतीने तपासणी
शहरातील मूर्ती कारखान्यांची महानगरपालिकेच्या वतीने तपासणी
अहमदनगर- अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त डॉ. श्री.विजयकुमार मुंडे यांनी शहरातील विविध मूर्ती कारखान्यांची तपासणी केली.या तपासणीत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठया प्रमाणात मूर्ती आढळून आल्या.मा.शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पर्यावरण पूरक मूर्ती निर्मिती करण्याचे आदेश असतानाही अनेक ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्मिती होताना आढळून आले.या संदर्भात महापालिकेत झालेल्या बैठकीत पर्यावरण पूरक मूर्ती तयार करण्यात याव्यात याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आली होत्या.
शहरातील पर्यावरण पूरक मूर्ती निर्मिती करणाऱ्या कारखानदारांनी महापालिका अहमदनगर येथे अधिकृत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभाग, मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक १२ मे २०२० रोजी मुर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केलेली आहेत. त्यास अनुसरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Water Prevention & Control of Pollution Act १९७४), तसेच मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व तांत्रिकी समिती समवेत झालेल्या बैठकीनुसार महाराष्ट्राच्या सर्व महापालिकांनी / नगरपरिषद यांनी सणांच्या कालावधीच्या अगोदर व नंतर करण्याच्या कार्यवाहीसाठी पत्र क्र. MPCB/JDC (WPC) / B-२४०२ २१-FTS-००८८ दिनांक २१.०२.२०२४ नुसार निर्देश दिलेले आहेत.
१. अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक जैव विघटक पदार्थापासून तयार करण्यात येतील, ज्या प्लास्टिक, थर्माकोल, POP पासून मुक्त असतील. अशा मूर्तीना प्रोत्साहन दिले जाईल. Plaster of Paris पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीना बंदी असेल.
२. सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच / रहिवासी संकुलातील टाकीमध्ये करणे अथवा मूर्ती स्विकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक आहे.
३. मूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडप उभारण्यासाठी विभागीय कार्यालयामार्फत परवानगी देण्यात येईल. सदर परवानगीची प्रत त्यांनी मंडपात दर्शनी भागात प्रसिद्ध करायची आहे. त्याची विभागीय कार्यालयाच्या पथकातर्फे पाहणी होईल, याची नोंद घ्यावी.
४. मूर्ती साठवणूकदारांनी देखील विभागीय कार्यालयामार्फत परवानगी घेणे बंधनकारक राहील. सदर परवानगीची प्रत त्यांनी मंडपात दर्शनी भागात प्रसिद्ध करायची आहे. त्याची त्याची विभागीय कार्यालयाच्या पथकातर्फे पाहणी होईल, याची नोंद घ्यावी.
५. पर्यावरणपूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्धतेनुसार महानगरपालिकेची जागा प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी त्यांनी त्याची विभागीय कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
६. पर्यावरणपूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांनी जागेसाठी अर्ज केल्यास ते स्वतः मूर्तीकार असणे बंधनकारक आहे. तसे हमीपत्र त्यांनी सादर करणे आवश्यक आहे.
७. पर्यावरणपूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडविणारे मूर्तीकार / साठवणूकदार यांनी, ते ‘शाडू माती / पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणार / साठवणार असल्याबाबतचे हमीपत्र महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे.
८. पर्यावरण पूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर ‘येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत’ अशा आशयाचा ३ x ५ एवढ्या आकारमानाचा फलक लावणे बंधनकारक आहे.
९. पूजा व उत्सव साजरे करण्या-या मंडळांनी उपरोक्त सूचविलेल्या पर्यावरणपूरक बाबीचा वापर करावा.
रंगासाठी हळद, चंदन, गेरु यांचा वापर करावा.
पुजेसाठी फुले, वस्त्र, इ. पूजा साहित्य पर्यावरणपुरक असावे.
काच, धातूपासून बनविलेल्या ताट वाट्यांचा वापर करावा.
प्लेटसाठी केळी व इतर पानाच्या पत्रावळीचा वापर करावा. एकवेळ वापराचे प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक साहीत्य वापरू नये.
नाशिक महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या मूर्तीकार/साठवूणकदार यांचेकडून पूजा व
मंडळाने मूर्ती प्राप्त करुन घ्याव्या.
उत्सव पूजा मंडळांनी नाशिक महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन व मूर्ती विर्सजनाचा आराखडा
देऊन एक महिना पूर्व परवानगी प्राप्त करावी.
१०. पर्यावरणपूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडविण्याचे / साठविण्याचे वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश सन २०२४ च्या नवरात्र उत्सवादरम्यान देखील लागू राहतील व त्यासाठी स्वतंत्र निर्देश / परिपत्रक / जाहिरात देण्यात येणार नाही.
११. सन २०२४ च्या सार्वजनिक उत्सावांसंदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये, संबंधित कारवाईस पात्र ठरतील.