भारताच्या गुन्हेगारी न्यायव्यवस्थेत बदल घडवून आणणारे तीन नवे गुन्हेगारी कायदे सोमवारी देशात लागू झाले असून, त्याप्रमाणे गुन्ह्यांची नोंदणी विविध राज्यात सुरू झाली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि भारतीय साक्ष संहिता हे कायदे सध्याचे सामाजिक वास्तव, आधुनिक काळातील गुन्हा यांचा विचार करून तयार करण्यात आले आहे. नवीन कायद्यांनी अनुक्रमे ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता, प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतली. बीएनएस अंतर्गत सर्व नवीन एफआयआर नोंदवले जातील तथापि यापूर्वी दाखल झालेले खटले अंतिम निकाल पर्यंत जुन्या कायद्याअंतर्गत चालवले जातील. अनेक तरतुदींचा समावेश करून नवीन कायदे आधुनिक न्यायप्रणालीमध्ये आणले आहेत. नवे कायदे सध्याच्या काही सामाजिक वास्तविकता लक्षात घेऊन गुन्ह्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. या घटनेत अंतर्भूत लक्षात ठेवून गुन्हे प्रभावीपणे हाताळण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करतात. असे अधिकृत सूत्रांनी सांगितलेले आहे. नवीन कायद्याअंतर्गत देशात पहिला गुन्हा मध्य प्रदेशामध्ये रविवारी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी मोटरसायकल चोरीचा नोंदवण्यात आला. तर दिल्ली पोलिसांनी सोमवारी कमला मार्केट परिसरातील रस्त्यावरील विक्रेत्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीनुसार पहिला एफआयआर नोंदवला. दिल्ली पोलिसांनी नवीन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यास सुरुवात केली आहे. असे आयुक्त संजय अरोरा यांनी सांगितले, ओडिषा पोलिसांनी भुवनेश्वरमध्ये एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला धमकावल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीविरुद्ध पहिला नोंदवलेला आहे.
Prev Post