ख्रिसमस आणि नव्या वर्षाला फटाके फोडण्यासाठी फक्त 1 तास सूट

नवी दिल्ली :
 

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल ने ख्रिसमस आणि नवी वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्ता चांगल्या असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्येही रात्री 11:30 ते 12:30 अशी फक्त एका तासाची वेळ फटाके फोडण्यासाठी देण्यात आली आहे.  


खरंतर, वाढत्या हवा प्रदुषणामुळे अनेक शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.  यामुळे एनजीटीने 9 नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते 30 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती.   इतकंच नाही तर दिल्ली सरकारनेही फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली होती.   इतकंच नाही तर दिल्ली सरकारनेही फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली होती.