शिधापत्रिकेतील दुरुस्तीसाठी सेतू केंद्रांपेक्षा डिजिटल पर्याय
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना घरबसल्या बदल करू शकता
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून कागदपत्रे काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डमध्ये नाव असणे महत्त्वाचे आहे. लग्नानंतर शिधापत्रिकेतील पत्त्यांमध्ये बदल करणे, नाव वगळणे, किंवा समाविष्ट करणे अशा कारणांसाठी महिला गर्दी करत आहे. परंतु उपलब्ध पब्लिक लॉगिनद्वारे घरबसल्या देखील शिधापत्रिका संबंधी बदल करू शकतो. राज्य सरकारने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत लाभार्थ्यांना किंवा ऑनलाईन शिधापत्रिका सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अशा सर्व शिधा पत्रिकाधारक लाभार्थ्यांना विनामूल्य ही सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यांमध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयक सेवा, ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत पब्लिक लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वात प्रथम नागरिकांनी शिधापत्रिका विषयक सेवेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://rcms.mahafood.gov.in/ या लिंक वर क्लिक करावे, साइन अप द्वारे नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी खाते तयार करा, यानंतर आधार क्रमांकावरील सर्व माहिती भरून नवीन खाते तयार करा, यासाठी मोबाईल क्रमांक, आधार कार्डशि लिंक असावा लागतो. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, लॉगिन केल्यानंतर, डॅशबोर्ड वर सर्व तपशील भरल्यानंतर, सर्व माहिती भरून झाल्यानंतर, आपल्या रेशन कार्ड, मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे जाते. दाखल झालेल्या प्रस्तावाची स्थिती लॉगिन करून आपण तपासून पाहू शकतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे इ-रेशन कार्ड आपल्याला उपलब्ध होते.