परमात्मांचा संदेश पुस्तकाशी फक्त 30 दिवस बोला तुमच्या जीवनात बदल घडेल: प्रदीप मुखर्जी

अहमदनगर (प्रतिनिधी): या जगात ज्यांच्याकडे काहीच नाही, दोन वेळचे अन्न नाही ते दुखी असतात हे मी समजू शकतो पण ज्यांच्याकडे सर्व काही आहे तरी देखील ते दुःखी कष्टी ! याला तुम्ही काय म्हणाल? धर्म, धर्मग्रंथ, उपासक, देवाचे संदेश वाहक यांच्याकडे मनुष्य दुःखी का आहे याचे उत्तर नाही किंवा ते भरकटत राहावे असेच त्यांना वाटते त्यामुळे परमात्मांचा संदेश या पुस्तकाशी तुम्ही फक्त 30 दिवस बोला तुमच्या जीवनात बदल घडेल असा विश्वास अलख गॉडचे मुख्य प्रवर्तक परमात्मांची थोर अनुभूती प्राप्त असलेले प्रबोधक प्रदीप मुखर्जी यांनी व्यक्त केला.
अलख गॉड संस्थेमार्फत प्रदीप मुखर्जी यांनी लिहिलेल्या परमात्मांचा संदेश या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन नगरच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भगवतीच्या प्रेमळ ऊर्जेचा वर्षाव करणाऱ्या श्रीमती फाल्गुनीजी पाठक आणि परमात्मां चे संदेशवाहक प्रदीप जी मुखर्जी तसेच आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच आणि राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, नगर मधील प्रसिद्ध उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया, युवा नेते उदयन दादा गडाख सौ. निलंगी गडाख आदी उपस्थित होते.
अहमदाबादच्या डॉल्फिन पब्लिशर संस्थेने छापलेल्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे विशाल राणे आणि भक्ती मारू तसेच रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना वर्षा पंडित, चंद्रकांत पंडित, प्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे, अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त जंगले साहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या पुस्तक प्रकाशाच्या सोहळ्याअगोदर मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रदीप मुखर्जी आपल्या विवेचनात पुढे म्हणाले की हे पुस्तक जे मानवाला पूर्णपणे हादरवून टाकते. यापूर्वी कधीही न लिहिले गेलेले असे पुस्तक जे परमात्मांनी मानवासाठी लिहिले आणि जे अनेक पुराणे धर्म अध्यात्म तत्त्वज्ञान जीवनाचा अर्थ आणि मानवाच्या अस्तित्वाचा उद्देश यांना धक्का देणारे आहे. एकदा का तुम्ही हे पुस्तक वाचून तुमच्या आयुष्यात परत गेलात की संमोहन तुम्हाला पुन्हा घेऊन टाकेल पण तुम्ही आता पूर्वीसारखे नसणार, काहीही बदलणार नाही, पण खूप काही बदलेल.
अवघ्या सत्तर पानांचे हे पुस्तक एका बैठकीत तुम्ही वाचून काढा आणि महिनाभर यावर काम करा, या पुस्तकातील दहाव्या भागातील संदेश आणि पुढच्या पानात दिलेल्या हीलिंग तंत्राचा वापर करा, तुम्ही कधीच दुःखी राहणार नाही असे त्यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर सर यांनी केले तर आभार कश्यप मॅडम यांनी मानले.
उपस्थित सर्वांना हे पुस्तक मोफत वितरित करण्यात आले आणि ही हिलिंग कार्ड प्रत्येकाला देण्यात आले.