पथ विक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल भुजबळ यांचा सत्कार

पथ विक्रेत्यांचे विविध प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार -आनंद लहामगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेच्या नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग गटातून सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल अजय बाळासाहेब भुजबळ यांचा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील, श्‍याम साळवे, सर्वेश डिक्कर, विकास उडानशिवे, विशाल नेटके, निखिल कोल्हे, विकी तिवारी आदी उपस्थित होते.
आनंद लहामगे म्हणाले की, नगर पथ विक्रेता समितीच्या माध्यमातून पथ विक्रेत्यांचे विविध प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे. भुजबळ यांची झालेली निवड ही सर्व मित्र परिवारास अभिमानास्पद असून, त्यांच्या माध्यमातून फेरीवाल्यांचे प्रश्‍न सुटणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली