पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार  

नवी दिल्ली :

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत अमेरिका, यूरोप, कॅनडा, कोरिया अशा २० देशांमधील बड्या कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वरिष्ठ अधिकारी आणि वित्तीय क्षेत्रातील नियामकही या बैठकीला उपस्थित राहतील. भारतातील अनेक मोठे उद्योजकही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

त्यात रतन टाटा, मुकेश अंबानी, नंदन नीलेकणी, उदय कोटक, दीपक पारेख आदी उद्योजकांचा समावेश असणार आहे.