खडक पोलीस ठाण्यात उडाला गोंधळ 

सहाय्य्क निरीक्षकाच्या कानशिलात भडकवली 

पुणे :
पुणे शहरात अनेक वर्षांपासून  कडक आवाज असणाऱ्या खडक पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणाची पूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. एका अधिकाऱ्याशी  घनिष्ठ मैत्री असणाऱ्या एका डॉक्टर महिलेने पोलीस ठाण्याच्या आवारातच  पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात मारल्याचे प्रकरण समोर आलं आहे. यामुळे कडक असणारे खडक  पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहेत.
संबंधित अधिकारी हे सहाय्यक निरीक्षक असून त्यांची  नुकतीच खडक पोलीस ठाण्यातून बदली झाली आहे. दरम्यान त्यांचे एका महिलेशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. मात्र काही कारणावरून त्यांचे वाद झाले होते. राग अनावर झाल्यांनंतर  हि महिला थेट पोलीस ठाण्यात आली.
ठाण्याच्या आवारातच त्यांचे वाद झाले आणि त्यांतूनच त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. महिलेने थेट संबंधित अधिकाऱ्याच्या कानशिलात मारली आणि अचानक तिथे गोंधळ उडाला .पोलीस ठाण्यात येऊन वर्दी परिधान केलेल्या सहायक निरीक्षकाच्या कानशिलात भडकावण्याची हिम्मतच कशी होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याची गंभीर दखल घेण्याची घेण्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरु आहे.