पन्हाळा ते पावनखिंड शौर्य गाथेचा थरार उघडणार

वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन

पुणे : वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या 364व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुण्यातील चांद्रसेनीय, कायस्थ प्रभू ट्रस्ट यांच्या वतीने ‘गोष्ट इथे संपत नाही. पन्हाळा ते पावनखिंड’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार 13 जुलै रोजी, शनिवार पेठ येथील चंद्रसेनीय, कायस्थ प्रभू कार्यालय ट्रस्ट या ठिकाणी संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आयटि क्षेत्रात काम करणारे सारंग भोईरकर व सारंग मांडगे हे दोन तरुण सदर कार्यक्रम सादर करणार असून, मराठ्यांच्या इतिहासातील एखादी घटना निवडायची आणि त्याचे प्रभावी सादरीकरण करीत, ती प्रेक्षकांसमोर सादर करायची. असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. आपला गौरवशाली इतिहास गोष्टी रूपाने आणि रंजकपणे अधिकाधिक नागरिकांसमोर यावा या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.