समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या भेगा

छत्रपती संभाजीनगर : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा एंटरचेंजनजीक तीन सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहे. महामार्गासाठी एम ४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास वीस वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता. तो फोल ठरला आहे.माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर मोठा खड्डाही पडलेला आहे.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.एमएस आरडीसीचे अधिकारी मात्र यावर बोलण्यास तयार नाही. या उभ्या भेगा गंभीर आहेत. कारण सिमेंट रस्त्यावर आडव्या भेगा या लवकर दुरुस्त करता येतात, पण उभ्या भेगा दुरुस्त करणे अवघड असते. खरे तर रस्ता तयार करताना भरावाची दबई व्यवस्थित न केल्याने किंवा रस्ता झाल्यावर क्युरिंग न केल्यामुळे अशा भेगा पडत असतात. असे तज्ञांचे मत आहे. किंवा तेवढा पाच निकृष्ट दर्जाचा असल्यास अशा भेगा पडू शकतात असेही त्यांनी यापुढे सांगितले आहे.