प्रियंका गांधी रिंगणामध्ये
मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसांच्या आज दोन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागतो. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये अमेठीबरोबरच केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवली होती. अमेठी त्यांचा पराभव झाला असला, तरी वायनाडच्या मतदारांनी त्यांना लोकसभेत पाठवल होत. त्यामुळे अमेठी आणि रायबरेलीबरोबरच वायनाड मतदार संघाबरोबरही गांधी कुटुंबाचं नाते जोडले गेले. यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी वायनाडबरोबरच सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीकडे त्यांचा विजय झाला होता. आता ते वायनाडमधून राजीनामा देणार असून त्यांच्याऐवजी प्रियंका गांधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचे संधी दिली जाणार असल्याचे काँग्रेसने आज जाहीर केले.