मालवाहू गाडीची एक्सप्रेसला धडक

पश्चिम बंगालमध्ये नऊ ठार 41 जखमी

जलपाईगुडी; कोलकत्ता आगर तळ्यावरून सिया लदाहच्या दिशेने जाणाऱ्या कांचनजुंगा एक्सप्रेसला आज सकाळी नऊच्या सुमारास मालवाहू गाडीने मागच्या बाजूने जोराचे धडक दिल्याने भीषण झालेल्या भीषण अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला तर अन्य 41 जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये हा पकार घडला. अपघातग्रस्त रेल्वे गाड्यांच्या सांगाड्याखाली आणखी काही प्रवासी अडकले असल्याचे मृतांच्या संख्यत वाढ होऊ शकते. कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक देणाऱ्या मालवाहू गाडीच्या चालकाची यात कोणतेही चूक नव्हती. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर त्या गाडीला सर्व रेड सिग्नल ओलांडण्याची परवानगी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राणीपात्र स्थानक समोरील स्टेशनने लिहिलेल्या टीए 912 या दस्ताऐवजात तसा उल्लेख करण्यात आला आहे. राणी पत्रा रेल्वे स्थानक ते छत्तरहाट जंक्शन दरम्यान नऊ सिग्नल असून संबंधित मालवाहू गाडी रेड सिग्नलकडे दुर्लक्ष करून आहे त्या वेगाने पुढे जाण्यास सांगितले होते. राज्य आणि केंद्र सरकारची यंत्रणा स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघात स्थळी बचाव कार्यरत आहे. मृतांमध्ये मालवाहू गाडीचा पायलट को-पायलट आणि सुरक्षारक्षकाचा देखील समावेश आहे. या अपघातानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुरमु पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातामधील जखमींना तातडीने उपचारासाठी उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.