कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या …

चंद्रपूर :

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे  यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.  पोलिसांनी नागपूरमधील फार्मसिस्टच्या केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.   शीतल आमटेंनी मागवलेल्या इंजेक्शन्सपैकी एक त्यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते.  डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मसिस्टकडून इंजेक्शन्स मागवली होती. ही इंजेक्शन्स अ‍ॅनेस्थेशिया श्रेणीतील आहेत.  शीतल यांनी मागवलेल्या पाच इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते.  त्यामुळे आता पोलिसांचा तपास या इंजेक्शनवर केंद्रित झाला आहे.