श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी रंगणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार शिष्यवृत्ती

नगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि.19 जानेवारी) जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर-मनमाड रोड येथील संजोग लॉन्स येथे सकाळी 10 वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.
10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी मध्ये जाणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी खास एका बॉलीवूड अभिनेत्या आमंत्रित करण्यात आले असून, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे. यावेळी आध्यात्मिक नेते ह.गु. गिरिवरधारी दास, माजी नगरसेवक निखिल वारे, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. सुनील पंडित आदींसह शिक्षण, राजकारण आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती   राहणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विशेष सरप्राईज लाँच करण्यात येणार आहे.