भाजपसह पंजाबी, शीख व सिंधी समाज बांधवांनी काढली आ. जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली

जगताप यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी तारकपूर भागातील नागरिकांचा निर्धार

नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.17 नोव्हेंबर) तारकपूर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यामध्ये पंजाबी, शीख व सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
झुलेलाल मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. महायुती सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती तसेच आ. संग्राम जगताप यांनी 10 वर्षात जवळपास 500 कोटी पर्यंत निधी आणून शहराच्या सर्वांगीन विकासासाठी केलेल्या कार्याचा जागर करण्यात आला. आ. जगताप तिसऱ्यांदा निवडून येतील व विजयाची हॅट्रिक करून शहरात एक नवा इतिहास घडवतील, असा विश्‍वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या प्रचार रॅलीत दामोदर बठेजा, बाळासाहेब भुजबळ, नितीन शेलार, ठाकुरशेठ नवलानी, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले, जनक आहुजा, प्रकाश जोशी, अनिल सबलोक, सुनिल तावरे, सुरेश हिरानंदानी, प्रशांत मुथा, गोपाल शर्मा, प्रिया जानवे, ज्योती दांडगे, श्रीचंद सचदेव, अर्चना बनकर, कालिंदी केसकर, छाया राजपूत, सुरेखा विद्ये, सुरेखा राजपुत, अजय ढोणे, महेश कराळे, जय रंगलानी, रामदास आंधळे, बलदेव सचदेव, संगिता खरमाळे, सागर बठेजा, मुकेश आसनानी, सुरेश बागडे, हर्षल बोरा, चेतन जग्गी, पियुष जग्गी आदींसह शीख, पंजाबी, सिंधी समाज बांधव व तारकपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.