भाजप २५ जूनला पाळणार संविधान हत्या दिन
आणीबाणी आणि संविधानावरून सत्ताधारी विरोधकात संघर्ष तीव्र
नवी दिल्ली : २५ जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. आणीबाणीच्या काळात अमानुष्य या त्यांना सहन करणाऱ्यांच्या योगदानाचे या दिवशी स्मरण करण्यात येईल. असे शहा यावेळी म्हणाले. यासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली. 25 जून 1975 रोजी केंद्रातील सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला. आणि भारतातील नागरिकांवर अत्याचार केले. असे अधिसूचनेत म्हटले आहे. या संदर्भात आणीबाणीत संविधान पातळी तुडवल्यामुळे काय झाले? याची आठवण 25 जून रोजी पाळण्यात येणारा संविधान हत्या दिन नेहमी जागृत ठेवणार आहे. असे नरेंद्र मोदी यांनी आपले मत मांडले आहे.