अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नालेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट व सुशिलाबाई सकट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी समर्थ ठोंबरे, सचीन कवडे, निरंजन आंबेकर, अभिषेक बिज्जा, सानिया शेख, प्रसाद सकट, अनुष्का कुचेकर, दिव्या उसके, योगीराज कुचेकर, साई वाघमारे, ओम मिसाळ, आरती सकट, पूजा सकट आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
सुनिल सकट म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या कार्याचा व विचारांचा जागर होणे महत्त्वाचा आहे. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी बहुजन समाजासह मुलींना शिक्षणाची दारे खुली करुन दिल्याने समाजाची प्रगती झाली आहे. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायी असून, आज देखील शिक्षणाने सामाजिक, वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी

Also see this and subscribe 

 

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नालेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, सुशिलाबाई सकट, समर्थ ठोंबरे, सचीन कवडे, निरंजन आंबेकर, अभिषेक बिज्जा, सानिया शेख, प्रसाद सकट, अनुष्का कुचेकर, दिव्या उसके, योगीराज कुचेकर, साई वाघमारे, ओम मिसाळ, आरती सकट, पूजा सकट आदी.