अहमदनगर:
सहा महिन्यांपासून बोल्हेगाव रस्ता ते राघवेंद्र स्वामी मंदिर, ह्या रस्त्याचे पॅचिंग चे काम करण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्यांनतर मदन आढाव यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता पंचिंग केलेलं होते. पंधरा दिवसांपूर्वी नगरसेवक मदन आढाव यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत महापालिका आयुक्त कार्यालयात बँडेज बांधून आंदोलन केले होते. त्यावेळी आयुक्तांनी आठ दिवसात काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या कामाला सुरवात करण्यात आलेली नाहीय. या पार्श्वभूमीवर नगरसेवक मदन आढाव यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत आज महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या कामाचे श्रेय विरोधक घेत आहेत असे मदन आढाव म्हणालेत. आयुक्तांनी अभियंत्यांना बोलून घेत रस्त्याच्या कामाबाबत कान उघडणी केली. ठेकेदाराला ही चांगले सुनावले. तरी देखील नगरसेवकांचे हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे. आयुक्त दालनाबाहेर पडल्यानंतरही या नगरसेवकांचे आंदोलन सुरू होते. या रस्त्याच्या कामासाठी आयुक्तांनी लेखी आश्वासन दिले होते. यावेळी शिवसेना नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक अशोक बडे, नगरसेवक निलेश भाकरे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, आदी उपस्थित होते.