समाजात एकोप्याने मिळून-मिसळून राहिल्यास गोडवा निर्माण होणार -अंजू शेंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश)
स्नेहालयात वंचित मुलांसह दीपोत्सव उत्साहात साजरा पणत्यांच्या झगमगाट, आतषबाजी व आकाश दिव्यांनी उजळले आसमंत; विविध खेळ व नृत्याद्वारे वंचितांची धमाल
नगर (प्रतिनिधी)- बुंदीच्या लाडूप्रमाणे समाजात एकोप्याने मिळून-मिसळून राहिल्यास गोडवा निर्माण होणार आहे. कोणासाठी काहीतरी करणे, ही भावना सामाजिक जाणीव म्हणून प्रत्येकात असली पाहिजे. मनुष्याला जास्तीचे पाहिजे असल्याने ओरबडण्याची प्रवृत्ती निर्माण होते व त्यातून प्रश्न निर्माण होत असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने सलग सतराव्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात वंचित घटकातील मुलांसह दीपोत्सव साजरा करण्यात आला. वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा सत्र न्यायाधीश शेंडे बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री पाटील, डॉ. एस.एस. दीपक, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, शरद मुनोत, मोहनशेठ मानधना, बाबूशेठ बोरा, ॲड. अनुराधा येवले, लायन्सच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरनकौर वधवा, खजिनदार अंजली कुलकर्णी, लियो क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा, सचिव रचिता कुमार, खजिनदार हर्षवर्धन बोरुडे, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, ॲड. श्याम असावा, हनीफ शेख, अरविंद पारगंवाकर
प्रशांत मुनोत, आनंद बोरा, सुनील छाजेड, दिलीप कुलकर्णी, डॉ. संजय असणानी, संतोष माणकेश्वर, सतीश बजाज, मानसी असणानी, अजित शिंगवी, अर्पिता शिंगवी, कैलाश नवलानी, नितिन मुनोत, अर्चना माणकेश्वर, पुरुषोत्तम झंवर, प्रकल्प प्रमुख आंचल कंत्रोड, गुरनूरसिंग वधवा, हर्ष किथानी, उमेश तलरेजा, आरवी कांगे, अंश कार्ला, प्रीत कंत्रोड, यश कांगे, शंभव कासवा, चंदना गुंदेचा आदी उपस्थित होते.
पुढे न्यायाधीश शेंडे म्हणाल्या की, शाळा मूल्यशिक्षण देणारे पहिले माध्यम आहे. चांगल्या शाळेतून चांगले नागरिक घडत असतात. सामाजिक बांधिलकी घेऊन सुजाण नागरिक देत असलेल्या योगदानाची फलश्रुती चांगला समाज घडविण्यासाठी होत आहे. ध्येय प्राप्तीसाठी सातत्य ठेवून भविष्य घडविण्याचे आवाहन त्यांनी केले. तर स्नेहालयाच्या सामाजिक कार्याचे व लायन्सच्या उपक्रमाचे कौतुक केले.
रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी व आकाश दिव्यांनी उजळलेले आसमंत तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या दीपोत्सवात स्नेहालयासह बालभवन मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रास्ताविकात लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर यांनी वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षी दीपोत्सवचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवाचे सतरावे वर्ष असून, लायन्स क्लब मधील प्रत्येक सदस्य सेवाभावाने स्वतःला झोकून समाज घडविण्याचे कार्य करत आहे. या सेवा कार्यात लिओच्या युवक-युवतींनी देखील सामाजिक भावनेने योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. लिओ क्लबच्या अध्यक्ष रिधिमा गुंदेचा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, सलग 16 वर्षे वंचितांसाठी दीपोत्सव साजरा करणे कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्याच्या दिव्यांनी समाजातील अंधकार दूर करण्याचे काम लायन्स करत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने योगदान दिल्यास समाजातील अनेक प्रश्न सुटणार आहे. वंचितांना आनंद देणे, ही आपली भारतीय संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
या. भाग्यश्री पाटील यांनी कायदेविषयक कार्यक्रम, मोफत विधी सेवेची माहिती दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि वंचित घटकातील बालकांना प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने असलेल्या योजनांची माहिती दिली. मुलांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श व सुरक्षित काळजी घेण्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस.एस. दीपक म्हणाले की, वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हा खरा दिवाळीचा आनंदोत्सव आहे. दरवर्षी या दीपोत्सवाने जीवनात वेगळा आनंद मिळतो. अशा सामाजिक उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी स्नेहालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रम रंगात आल्यावर डिजेच्या तालावर बालगोपालासह उपस्थित पाहुण्यांनी गीतांवर ठेका धरला होता. या मेळाव्यात मुलींनी हातावर मेहंदी, मुलांनी टॅटू काढून विविध खेळांचा आनंद लुटला. यावेळी घेण्यात आलेल्या किल्ला बनवा व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रिया बोरा, भावना छाजेड, डॉ. मानसी असणानी, रिधिमा गुंदेचा यांनी काम पाहिले.
संध्याकाळी स्नेहालय परिसरात लावण्यात आलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने लखलखाट झाला होता. तर फटाक्यांच्या आतषबाजीने व आकाश दिव्यांनी आसमंत उजळून निघाले. या धमालमय कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना वडा पाव, खाऊ, चॉकलेट, आईस्क्रिमसह भोजनाची मेजवानी होती. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजबीरसिंह संधू, कुकरेजा ब्रदर्स व बाजार पेठेतील व्यापाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश गायकवाड यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घर घर लंगर सेवा, स्नेहालय परिवार, बालभवन व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.