अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक पेन्शन असोसिएशनच्या वतीने अहमदनगर येथे पेन्शन मेळाव्याचे आयोजन
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक पेन्शनर असोसिएशनच्या वतीने अहमदनगर येथे पेन्शन मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नक्षत्र लॉन्स बुरुडगाव रोड येथे आयोजित करण्यात आला असून सदर मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित राहणार आहेत. पेन्शनर संघटनेच्या वतीने खासदार निलेश लंके व भाऊसाहेब वाघचौरे यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. कारण खासदार निलेश लंके हे प्राथमिक शिक्षकांचा मुलगा असून खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे स्वतः प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे या दोघांबद्दलही पेन्शनर शिक्षकांमध्ये आत्मियता आहे. खासदार निलेश लंके हे पेंशनर संघटनेचे सभासद ज्ञानदेव लंके यांचे चिरंजीव आहेत. ते आमदार असताना प्राथमिक शिक्षकाचा मुलगा म्हणून त्यांनी सेवानिवृत्तांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मंत्रालय पातळीवर वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील एक मुलगा स्वकर्तृत्वावर खासदार झाला, हा आम्हा सेवानिवृत्त शिक्षकांच्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण आहे. त्याचप्रमाणे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील स्वतः प्रथमिक शिक्षक होते नंतर गटविकास अधिकारी व नगर जिल्हा परिषदमध्ये उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. दोन्ही खासदार प्राथमिक शिक्षकांशी संबंधित असल्यामुळे नगर शहरात सेवानिवृत संघटनेच्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आलें आहे.
पेंशनर संघटना ही धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संघटना असून के ग.रा.पोखरकर, कै सो.सा. गायकवाड यांनी जिल्ह्यात संघटना बांधणीसाठी खरे योगदान दिलेले आहे. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त एका छत्रछायेखाली आहेत. बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी होणार्या कार्यक्रमात जिल्ह्यातील व राज्यातील सेवानिवृत्तांचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी संघटनेला चांगले व्यासपिठ मिळाले असून नियोजित मेळाव्यासाठी पेंशनर संघटनेचे राज्याध्यक्ष वसंतराव सबनिस, उपाध्यक्ष सदूभाऊ सोनवणे, धुळे पेंशनर संघटनेचे अध्यक्ष अनंतराव पाटील यांसह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यकमात दोन्ही खासदार महोदयांना संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास उपस्थित राहणार्या सर्व सेवानिवृत्तांचा स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ देऊन स्वतः खासदार निलेश लंके यांच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे. स्नेहमेळाव्या निमित्ताने स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. तरी स्नेहमेळाव्यास जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष द.मा.ठुबे, ब.द.उबाळे, भा.क.गोरे, सोन्याबापू वाकचौरे, भाऊसाहेब डेरे, द.म. शिंदे, अशोक बागूल, प.से. घुले, का.द.शिकारे, ज.प. काळे, शशिकांत इथापे, सु.पा. वांढेकर, विनायक कोल्हे, बापूसाहेब कर्पे, महादेव सरोदे, पोपट भुते, श्री पू कुलकर्णी, प्रतापराव देवरे, लतिका घुले, मंदाकिनी बाबर तसेच सर्व तालुका अध्यक्ष व जिल्हाकार्यकारणी यांनी केले आहे.