बोल्हेगाव नागपूर परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची नगरसेवक ऍड. राजेश कातोरे व कुमार वाकळे यांची मागणी

शहर अभियंता परिमल निकम व सोनटक्के यांना दिले निवेदन

अहमदनगर: 

नगर शहरातील महत्वाचे उपनगर असलेल्या बोल्हेगाव नागपूर परिसराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अँड. राजेश कातोरे व कुमार वाकळे यांनी आपली निवेदने पालिकेला दिली . मनपा पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता परिमल निकम आणि सोनटक्के याच्यासोबत त्यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.
मनपा पाणीपुरवठा योजना फेज २ चे या भागातील काम पूर्ण झाले आहे. येथील सव्वा ११ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून तयार आहे. तिची साफसफाई देखील झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असून त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे आश्वासनअभियंता सोनटक्के यांनी दिले आहे.

 

 

या भागात करण्यात येणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे. लोकांना कोरोना संक्रमणाच्या काळात देखील मनपा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे दूषित पाण्याच्या पुरवठा होतो आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना तसेच बरे झालेल्यांना बुरशी मुळे म्युकर मोयकोसिस रोगाची लागण होण्याचा धोका आहे. दूषित पाणी हे बुरशी निर्मतीचे प्रमुख कारण आहे. तरी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या विसंगत आदेशामुळे थेट नळावाटे दूषित पाण्याचा पुरवठा येथील रहिवाशांना दोन दोन दिवस करण्यात आला . याबाबत तक्रार देखील झाली पण कारवाई झाली नाही . आता या दूषित पाण्यामुळे लोकांना कोरोना व म्युकर मायकोसिस सोबत कॉलरा , टायफाईड आणि काविळीची देखील लागण झाली आहे. या भागात ते रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तेव्हा जर यामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास याला पालिकेचे अधिकारीच जबाबदार राहतील .

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

नगर शहर पाणीपुरवठा योजना फेज २ अंतर्गत केंद्र सरकारच्या यु डी आय एस एस एम टी योजनेतून नागपूर, बोल्हेगाव , गांधीनगर व नागपूर गावठाण या परिसरात एच डी पी इ पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा अकरा लाख लिटर ची टाकी बांधण्यात आली आहे.  लाईन चेक करण्याचे काम झालेले आहे. ही टाकी व पाईपलाईन कार्यन्वित करावी . तसेच या भागात दूषित व कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. जो की खूप धोकादायक आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना सुरु करून नवीन कनेक्शन देण्यात यावेत. त्यासाठी कमीत कमी फी अकरावी सद्यस्थितीत बाधित परिसरात टँकर ने पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. येत्या काही दिवसात या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलन करू आणि त्याला सर्वस्वी आयुक्त जबाबदार राहतील असा इशारा वाकले व कातोरे यांनी दिला आहे.