रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्षपदी अजीम खान यांची नियुक्ती.

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्षपदी अजीम खान यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शहर जिल्हा अध्यक्ष सुशांत मस्के यांच्या नेतृत्वाखाली निवडीचे पत्र देण्यात आले व यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेतेडॉ. राजेंद्र गवई समवेत पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालत आहे. सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन कार्य सुरु असून, जातीयवादी शक्तीच्या विरोधात पक्ष उभा असून सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष उभा असल्याची भावना व्यक्त केली व नवनिर्वाचित अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान मनाने की, पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करुन शहरात पक्ष वाढविण्याचा संकल्प केला असून अल्पसंख्यांक समाजाच्या अनेक अडीअडचणी सोडून प्रत्येक शासकीय योजना ची माहिती घरोघरी देणार व पक्ष वाढीसाठी मदत करणार असल्याची भावना व्यक्त केली तर या निवडीबद्दल खान यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.