व्हिएन्नात दहशतवादी हल्ला

तीन जणांचा मृत्यू

व्हिएन्ना :
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.अनेकजण या दहशतवादी हल्ल्यातजखमी झाले आहेत.
हा दहशतवादी हल्ला असल्याचे ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे.
हा हल्ला १२ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा होता असं चर्चिले जात आहे. सहा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
हल्लेखोरांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून यामध्ये एका पोलिसाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराला ठार केले आहे.
करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियात लॉकडाउन सुरू होणार होता. त्यामुळे व्हिएन्नात मोठी गर्दी होती. स्थानिक वेळ, सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे.